
ठाणे: आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जांभळी नाका, ठाणे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित ‘चैत्र नवरात्रोत्सव २०२६ भक्ती व कला महोत्सवात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. महोत्सवाच्या सहाव्या दिवशी समाज, शिक्षण, आरोग्य आणि कला अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नऊ पुरुषांना ‘नवरत्न पुरस्कार’ तर नऊ महिलांना ‘नवदुर्गा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यात खालील मान्यवरांचा गौरव करण्यात आला:
नवरत्न पुरस्कार: डॉ. दत्तात्रय उर्फ सागर श्रुती सुर्यकांत सावंत, श्री. मकरंद विजय जोशी, श्री. सतीश रामचंद्र धुरत, श्री. शुभम सुनील उतेकर, डॉ. ऋषिकेश वैद्य, श्री. सचिन श्रीधर चव्हाण, डॉ. अमित लालासाहेब खोमणे, श्री. प्रफुल्ल शिवराम आठवले, श्री. केदार बापट.
नवदुर्गा पुरस्कार : कु. खुशी प्रवीण म्हात्रे, कु. याशी धरम मेहता, सौ. रेखा शिंदे, डॉ. काबेरी सोम, सौ. प्रतिभा आदेश चांदुरकर, सौ. कलिका संदीप विचारे, डॉ. चेतना आशिष बक्षी, कु. दिशा रविंद्र कदम, सौ. साधना चंद्रशेखर ठाकूर.

विशेष म्हणजे, पुरस्कार वितरणानंतर काही मानकरींनी आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
मान्यवरांची मांदियाळी
महोत्सवाच्या या दिमाखदार सोहळ्याला मा. सौ. रश्मीताई ठाकरे, आमदार श्री.सुनील शिंदे, ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री. सौरभ राव व त्यांच्या पत्नी यांनी विशेष उपस्थिती लावून देवीची आरती केली.
जांभळी नाक्यावर घुमला लोककलेचा जागर – folk युवा’च्या सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध
ठाणे :- आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित ‘चैत्र नवरात्रोत्सवात महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल लोककलेचा अविष्कार पाहायला मिळाला. ‘folk युवा’ समूहातील ठाण्यातील तरुण मुलांनी सादर केलेल्या बहारदार लोकगीत आणि शिवगीतांच्या सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.









