सौ. लता एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना छत्री वाटप

ठाणे – कायम शिवसैनिकांचा मायेने विचार करणाऱ्या, खंबीरपणे एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. लता एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना आज छत्री वाटप करण्यात आले.
आनंदआश्रम येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला ठाण्याच्या महापौर सौ. शर्मिला पिंपळोलकर, ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते पवन कदम, मेअर फार्माचे संचालक राजेश तावडे, उमा कालेकर, बाळा गवस, किरण नाकती, धर्मवीर दिव्यांग सेनेचे शरद पवार, गिरीश मेहरोल उपस्थित होते. ठाणे शहर आणि परिसरातील दिव्यांग बांधव आणि भगिनी यावेळी उपस्थित होत्या.
लता वहिनी या नेहमीच शिवसैनिकांची मायेने विचारपूस करतात, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होतात, प्रत्येक कार्यकर्त्याला कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वांच्या मनात लता वाहिनी यांचे विशेष स्थान आहे. शिंदे साहेबांच्या प्रत्येक सामाजिक आणि लोकहिताच्या कार्यात त्या खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहतात त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज मोफत छत्री वाटप करून समाजोपयोगी उपक्रम राबविल्याची प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.









