
“महाबळेश्वरच्या विकासाला विकासाला गती, देणार”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
“महाबळेश्वरमध्ये भगवा फडकणार ! शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश”
महाबळेश्वर, ता. 15 :
“आपण माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्याचे काम मी नक्कीच करीन. या भागातील विकासासाठी कुठेही पैशांची कमतरता भासू देणार नाही,” असा ठाम शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वरमध्ये बोलताना दिला. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील सातारा जिल्हा आणि महाबळेश्वर परिसरात झालेल्या विकासकामांची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.
महाबळेश्वरमध्ये आज मोठ्या उत्साहात झालेल्या प्रवेश सोहळ्यात सुभाष कारंडे, यशराज भोसले, संजय मोरे, अजित सकपाळ, लक्ष्मी मालुसरे, संगीता गोंदकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांचे मनापासून स्वागत करत त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले.
यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले, “तुम्ही दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तो विश्वास सार्थ करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. महाबळेश्वर आणि सातारा जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी सरकार कोणतीही कसर ठेवणार नाही.”
आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर बोलताना शिंदे म्हणाले, “ही निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सर्वांनी एकजुटीने पुढील लढाईत उतरून भगवा फडकवण्याचे काम करायचे आहे.”
लाडकी बहिण योजनेबाबत अफवा पसरवल्या जात असल्याचा उल्लेख करत त्यांनी विरोधकांना इशारा दिला. “लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नाही, बंद करू देणार नाही. अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी सावध राहावे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांना सूचना करताना ते म्हणाले, “या भागातील सर्व प्रलंबित आणि सुरू असलेल्या विकासकामांवर बारीक लक्ष ठेवावे”, “महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासाला सरकारकडून पूर्ण गती देण्यात येईल,” असे त्यांनी आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी नव्या प्रवेशकर्त्यांचे पक्षात अधिकृत स्वागत करण्यात आले. या मोठ्या प्रवेशामुळे महाबळेश्वर तालुक्यात शिंदे गटाची ताकद आणखी वाढल्याचे मत व्यक्त केले.
…..







