आजही अनेक ठिकाणी नागरी भागांमध्ये मासिक धर्माबाबत विद्यार्थी आणि स्त्रियांबाबत जागरूकता करणं आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे याच पार्श्वभूमीवरती मिसेस महाराष्ट्र 2025 रणर अप आणि मेसेज इंडिया लिगसी 2025 चा विजेत्या अंशू यादव यांच्या वतीने जनजागृती पर कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. ठाण्यातील वागळे परिसरातील राजर्षी शाहू महाराज या शाळेमध्ये आज हा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी करता राबविण्यात आला. यामध्ये मिसेस महाराष्ट्र 2025 च्या रणर अप अणि मिसेस इंडिया लीगसी 2025 च्या फायनल लिस्ट अंशू यादव यांच्या वतीने विद्यार्थ्यांशी संवाद सादर याबाबत जनजागृती करण्यात आली. या काळामध्ये कशाप्रकारे स्वतःची काळजी घ्यावी, याबाबतील गैरसमज, कोणत्या गोष्टी कराव्यात, आरोग्यासाठी होणारे फायदे या गोष्टीचे महत्त्व इत्यादींबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच शालेय विद्यार्थिनीला सॅनिटरी पॅडचे महत्त्व सांगत मोफत वाटप करण्यात आले. अंशू यादव यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त खरतर हा उपक्रम राबवला विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देखील दिल्या. डायडम मासिक सत्य या उपक्रमांतर्गत विविध शाळांमध्ये मिसेस महाराष्ट्र 2025 रणर अपच्या अंशू यादव हा उपक्रम राबविणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.









