
प्रतिनिधी – देशासाठी शहीद झालेले वीर जवान नेहमी स्मरणात राहावे यासाठी खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिका प्रभाग क्र. १२ सिद्धेश्वर तलाव परिसरात सन २०१० मध्ये शहीद उद्यानाची निर्मिती केली. या उद्यानात गेली १५ वर्षे देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना मानवंदना देण्यात येत आहे. मुंबईत २६/११ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात आपल्या वीर जवानांना प्राण गमवावे लागले होते त्यांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम दरवर्षी केला जातो.
या कार्यक्रमाच्या समारोपास महापालिकेचे अग्निशमन दल, पोलीस दल, यांनी श्रद्धांजली अर्पण केली आणि उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या समवेत बाल युवकांचे देशभक्तीवर सुंदर नृत्य सादर झाले.
त्यावेळी प्रमुख नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अभय महाजन, आयोजक शिवसेना नेते राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, सुनील पाटील, उपशहर प्रमुख सचिन चव्हाण, माजी नगरसेवक संजय दळवी, अमोल हिंगे, विभाग प्रमुख लहू सावंत, योगेश भोईर प्रवीण उतेकर, प्रदीप शेडगे, स्वप्निल शेरकर, जिवाजी कदम, राजु मोरे, शशिकांत कालगुडे, चंद्रकांत विधाते, विजय देसाई, फिरोज खान, दादा रेपाळे, माजी नगरसेवक मंदार विचारे, परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक, शाखाप्रमुख धोंडू मोरे, तानाजी कदम त्याचबरोबर महिला जिल्हा संघटक रेखाताई खोपकर, उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे, अनिता प्रभू, संगीता साळवी, नीलिमा शिंदे, कांता पाटील, सुनंदा देशपांडे, छाया आरामगृह, रूपाली लोहाटे, राजश्री सुर्वे, अशा शिंदे, सायली चांदिवडे, मयुरी कदम, उषा बोरुडे, अपर्णा भोईर, रसिका सुभेदार, अर्चना शाहीर, आरती खळे, अर्चना बागवे, सुचिता वेदपाठक, शहीद घडियाल तसेच सर्व उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, शिवसेना, युवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







