
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटदारांचा एल्गार
इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या पावसाळी छत्र्यांप्रमाणे
प्रशासनाला दिली छत्र्यांची भेट
ठाणे – गेले अनेक वर्षे ठेकेदारांनी ठाणे जिल्ह्यासह राज्यभर विकासकामे केली आहेत. मात्र, त्यांना त्यांची बिले अदा केली जात नाहीत. उलटपक्षी इन्फ्रास्ट्रक्चर नावाने अचानक उगवलेल्या कंपन्यांना तत्काळ बिले अदा केली जात आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली “छत्री आंदोलन ” करण्यात आले.
राज्य सरकारच्या विविध विभागातील विकास कामे मार्गी लावणाऱ्या तीन लाखांहून अधिक कंत्राटदारांची ९० हजार कोटींची बिल थकवली आहेत. थकीत बिलाची रक्कम मिळावी यासाठी कंत्राटदारांनी, आम्ही अनेकदा आंदोलने केली, ५ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले. मात्र आतापर्यंत ४ टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे.तसेच
इन्फ्रावाल्यांना कामही देतात आणि पैसेही देतात पण कंत्राटदारांना पैसेही देत नाहीत
थकीत बिलाची रक्कम मिळावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करूनही फक्त आश्वासन दिले जाते. त्याचा निषेध करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळेस आंदोलकांनी पाऊस नसतानाही हातात छत्र्या घेऊन इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपन्या या पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांप्रमाणे आहेत. पावसाळा संपला की या छत्र्या अडगळीत बंद केल्या जात असतात. हे माहित असूनही वर्षानुवर्ष राज्यात विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांना बाजूला सारून या नव्या कंपन्यांना कामे देऊन बिले अदा केली जात असल्यानेच हे छत्री आंदोलन केल्याचे सांगितले.
दरम्यान,जानेवारी 2024 ते सप्टेंबर 2024 या कालावधीत राज्य सरकारने सुमारे दीड लाख कोटींची कामे नियमबाह्य पद्धतीने वाटली. त्यावेळी अर्थ विभागाचीही परवानगी घेतली गेली नव्हती. त्यामुळेच सध्याची परिस्थिती उद्भवली आहे. राज्यातील विविध विभागांत झालेल्या विकास कामांच्या देयकांची ४० हजार कोटी रुपयांची थकीत रक्कम तातडीने मिळावी, राज्य सरकारने कोणत्याही विभागाचे विकास काम खर्चाची आर्थिक तरतूद करूनच मंजूर करावे, विकास कामे करताना संबंधित कंत्राटदारास संरक्षण देण्याचा कायदा करावा, शासनाने सर्व विभागांच्या छोट्या कामांचे एकत्रीकरण करून एकच मोठी निविदा काढणे तातडीने बंद करावे, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास या खात्यांमधील कामांचे वाटप अभियंत्यांना नियमांनुसार करावे आदी मागण्या यावेळी मंगेश आवळे यांनी पत्रकारांशी बोलताना केल्या. या आंदोलनात अनिल नलावडे,बाळकृष्ण ठाकरे,चेतन शिंदे,मिलिंद साठे,हर्षद गंधे प्रवीण बाहेती,मनुरकर सपकाळ ,सरोदे हांडे ,बाविस्कर दर्शना शिंदे ,रवी मालुसरे आदी सहभागी झाले होते.