
ठाणे जिल्ह्यामध्ये महिला व बालविकास विभाग अंतर्गत “पोषण भी पढाई भी” प्रशिक्षण संपन्न.
महिला व बालविकास विभाग अंतर्गत “पोषण भी पढाई भी ” ठाणे जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्व सेविकांना फार मोलाची माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणावेळी विभागातील अधिकारी उपस्थित होते. महिला व बाल विकास प्रकल्प ठाणे अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी भिवंडी पश्चिम संतोष भोसले , बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ठाणे पूर्व गणेश जाधव , बालविकास प्रकल्प अधिकारी ठाणे पश्चिम वैभव कांबळे तसेच कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच प्रमुख उपस्थितीत मुख्य सेविका शलाका भट , मनीषा विचारे , कल्पना कसबे , अर्चना भरणे , विजयता व्यापारी , कल्पना भोयर, सायली जाधव , क्षमा टेंभे , दिपाली संखे , कविता अवसरमल, सीडीपीओ ज्योती पाटील यांच्या मार्गदर्शनातून “पोषण भी पढाई भी ” हे तीन दिवसाचे प्रशिक्षण दिनांक चार नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात आले. या प्रशिक्षणाअंतर्गत सर्व अंगणवाडी सेविकांना बालकांच्या सर्वांगीण विकासाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. गरोदर माता, स्तनदा माता ,किशोरवयीन मुली, शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालके यांच्या आहार ,आरोग्य लसीकरण, शालेय शिक्षण याबाबत उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्याचबरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या बदललेल्या धोरणाअंतर्गत जे बदल झाले आहेत त्यानुसार अंगणवाडी स्तरावर जे कामकाज करावयाचे आहे त्याचे मार्गदर्शन करण्यात आले. शून्य ते तीन वर्ष व तीन ते सहा वर्ष बालकांच्या विकासाबाबत मार्गदर्शन, अंगणवाडीच्या मुलांसाठी जे आधारशीला आणि नवचेतना अभ्यासक्रम आले त्याबाबत तसेच बालकाच्या 1000 महत्त्वाच्या दिवसाबद्दल माहिती सांगण्यात आली. स्तनपानाचे महत्त्व, पौष्टिक आहार घटकाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तीव्र कमी वजनांच्या मुलांचे व्यवस्थापन, दिव्यांग मुलांचे प्रकार व त्यांना कसे सामावून घ्यावे याबाबत माहिती व.त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात लवकरात लवकर सामावून घेणे, त्याचबरोबर भविष्यात जे अंगणवाडी स्तरावर बदल घडणार आहेत त्याच्याबद्दल ही खूप उपयुक्त माहिती देण्यात आली. प्रकल्प अधिकारी संतोष भोसले यांनी सर्व सेविकांना मोलाचे मार्गदर्शन केले.या प्रशिक्षण कालावधीमध्ये तीन दिवस वेगवेगळ्या प्रकारे प्रशिक्षण देऊन वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेण्यात आल्या त्याबद्दल सर्व प्रकल्प अधिकारी आणि सर्व मुख्य सेविका यांचे धन्यवाद व्यक्त करण्यात आले. या ट्रेनिगला प्रकल्प बालविकास प्रकल्प कार्यालय ठाणे शहर पश्चिम ,बालविकास प्रकल्प कार्यालय मीरा-भाईंदर , बालविकास प्रकल्प कार्यालय नवी मुंबई यांचा सहभाग होता.







