
“दुबार मतदार वगळता येत नसतील, तर सर्वांनाच दुबार मतदान नोंदणीची परवानगी द्या”; माजी नगरसेवक संजय घाडीगावकरांची उपरोधक मागणी
मुंबई:”जर दुबार आणि बोगस मतदार वगळून निवडणूक घेता येत नसेल, तर निवडणूक आयोगाने सर्व नागरिकांना दुबार मतदार नोंदणी करण्याची परवानगी द्यावी,” अशी उपरोधक मागणी माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी एका ट्विटच्या माध्यमातून केली आहे.
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका करत घाडीगावकर यांनी म्हटले आहे की, “आजच्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग दुबळा दिसला.”
आपल्या ट्विटमध्ये त्यांनी आयोगाला थेट सवाल केला आहे. “जर दुबार मतदार नावे निवडणूक आयोगाला वगळता येत नसतील, तर ‘सर्वांना समान न्याय’ या पद्धतीने सर्व नागरिकांना दुबार मतदार नोंदणी करण्याची परवानगी द्या,” असे त्यांनी म्हटले आहे. “निवडणूक आयोग बघा जमतय का तुम्हाला!” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.
या ट्विटच्या शेवटी #पारदर्शकनिवडणूकहवी आणि #पारदर्शकनिवडणूकआयोगहवा या हॅशटॅगचा वापर करून, त्यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.







