
महिंद्राची ‘ग्लोबल व्हिजन २०२७’ची घोषणा : मॉड्युलर, बहुऊर्जा स्वरुपाच्या एनयू-आयक्यू प्लॅटफॉर्मवर चार जागतिक दर्जांच्या एसयूव्ही डिझाइन संकल्पना सादर.
व्हिजन २०२७ : एनयू-आयक्यू प्लॅटफॉर्मवर महिंद्राच्या नव्या पिढीतील एसयूव्ही येणार २०२७पासून बाजारात.
हार्टकोर डिझाइन : नव्या संकल्पनांमध्ये महिंद्राच्या हार्टकोअर डिझाइन तत्त्वज्ञानाच्या पुढच्या पिढीचे दर्शन.
अशक्यतेच्या पलीकडचा शोध : एनयूआयक्यू हा बहु-ऊर्जा स्वरुपाचा प्लॅटफॉर्म ही भारत व जागतिक स्तरावरील अनोख्या संधींचा वेध घेण्यासाठी साकारलेली एक क्रांतिकारी संकल्पना. कोणत्याही तडजोडीशिवाय निर्माण होणाऱ्या जागतिक दर्जाच्या एसयूव्ही : कमांड सीटिंगसह उत्कृष्ट ड्रायव्हिंग डायनॅमिक्स या वाहनांच्या श्रेणीत सर्वाधिक बूट स्पेस असलेली, अतिशय प्रशस्त केबिन फ्लॅट-फ्लोअर आर्किटेक्चरमुळे डिझाइन बोर्डवरून वास्तवात आलेली पहिली फ्लॅट-फ्लोअर आयसीई एसयूव्ही उच्चतम सुरक्षा मानके असलेले हलके वजनाचे डिझाइन साय-फाय तंत्रज्ञान आणि सहज समजणारे एनयूयूएक्स : पुढच्या पिढीचे एकात्मिक डोमेन आर्किटेक्चर
जुळवून घेण्याची अमर्याद क्षमता : एकाहून अधिक टॉप हॅट्स, पॉवरट्रेन, एफडब्ल्यूडी / एडब्ल्यूडी, एलएचडी / आरएचडी यांच्याशी सुसंगतता
ठाणे,16ऑगस्ट 2025 : महिंद्रा अँड महिंद्रा या भारतातील अग्रगण्य एसयूव्ही उत्पादक कंपनीने आज एनयू_आयक्यू हा आपला पूर्णपणे नवा, मॉड्युलर व बहुऊर्जा प्लॅटफॉर्म सादर केला. हा प्लॅटफॉर्म पुढच्या पिढीतील क्रांतिकारक एसयूव्हींच्या नव्या श्रेणीचा पाया ठरणार आहे. या निमित्ताने कंपनीने या प्लॅटफॉर्मवर चार जागतिक दर्जाच्या एसयूव्हींच्या संकल्पना दाखवून आपली पुढील पिढीतील उत्पादने कशी असतील याची झलक दिली.
हा क्रांतिकारी एनयू-आयक्यू प्लॅटफॉर्म महिंद्राच्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील नवोन्मेषी धोरणाचा परिणाम आहे. प्रवासाची परिभाषाच बदलणारी, ग्राहकांना तडजोडींपासून मुक्त करणारी वाहने तयार करण्यावर कंपनी भर देत आहे. या दूरदृष्टीची प्रत्यक्ष झलक चार जागतिक दर्जाच्या एसयूव्हींच्या संकल्पनांद्वारे या प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात आली. व्हिजन.एस, व्हिजन.टी, व्हिजन.एसएक्सटी आणि व्हिजन.एक्स अशी या संकल्पनांची नावे आहेत. ही वाहने बाजारातील पोकळी भरून काढत असताना, महिंद्राच्या मूलभूत वैशिष्ट्यांशी प्रामाणिक राहतील. लक्षवेधक रचना, जोशपूर्ण कामगिरीसाठी तत्पर शक्ती, जागतिक दर्जाची सुरक्षा, आजच अनुभवायला मिळणारी भविष्यकालीन तंत्रज्ञानाची झलक आणि कणखर पण अभिजात व्यक्तिमत्त्व अशी या वाहनांची वैशिष्ट्ये आहेत.
महिंद्रा अँड महिंद्राच्या ऑटोमोटिव्ह बिझनेस विभागाचे नियोजित प्रमुख आणि महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आर. वेलुसामी म्हणाले, “एनयू-आयक्यू हा महिंद्राच्या जागतिक एसयूव्हींसाठीचा भविष्यातील धोरणात्मक प्लॅटफॉर्म आहे. त्याच्या मॉड्युलर व बहुऊर्जा रचनेमुळे आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ‘टॉप हॅट्स’ आणि ‘पॉवरट्रेन’मध्ये नाविन्य आणण्याची संधी मिळेल आणि त्यातूनही आमच्या एसयूव्हींच्या मूळ गुणसूत्रांशी निष्ठावान राहता येईल. परस्परविरोधी वैशिष्ट्यांचा समतोल साधण्यासाठी डिझाइन केलेला हा एनयू-आयक्यू प्लॅटफॉर्म आमच्या पुढील पिढीच्या एसयूव्हींचा पाया आहे. हे एक धाडसी पाऊल आहे, ही एका नव्या युगाची सुरुवात आहे. यामध्ये ग्राहकांना तडजोडींपासून मुक्त करून, त्यांना खरोखरच हव्या हव्या वाटणाऱ्या, प्रीमियम दर्जाच्या एसयूव्ही मुख्य प्रवाहात आणल्या जातील.”
महिंद्रा अँड महिंद्राच्या ऑटो आणि फार्म सेक्टर्सचे चीफ डिझाइन अँड क्रिएटिव्ह ऑफिसर प्रताप बोस म्हणाले, “मुंबई आणि इंग्लंडमधील बॅनबरी येथील आमच्या ग्लोबल डिझाइन स्टुडिओमध्ये तयार करण्यात आलेल्या एनयू-आयक्यू एसयूव्ही आमच्या हार्टकोअर डिझाइन तत्त्वज्ञानाच्या नव्या पर्वाची सुरुवात दर्शवतात. माणसांमध्ये आणि त्यांच्या वाहनांमध्ये भावनिक नाते निर्माण करणारे डिझाईन हेच उत्तम असते, या आमच्या मुख्य विचारावर या संकल्पना आधारित आहेत. याच तत्त्वाने नव्या भविष्यासाठी ही डिझाईन्स साकारण्यात आली आहेत. ‘विरोधाभासाचे आकर्षण’ या संकल्पनेवर आधारित, परस्परविरोधी घटकांची सांगड घालून अभिव्यक्तिपूर्ण डिझाइनची परिभाषा येथे तयार करण्यात आली आहे. या संकल्पना जगाच्या कोणत्याही भागात, कोणत्याही भूभागावर साहस, आत्मविश्वास आणि नात्यांची प्रेरणा देणारे अनुभव देण्याचे आश्वासन देतात.”
महिंद्रा अँड महिंद्राच्या ऑटोमोटिव्ह विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल लि.चे कार्यकारी संचालक नलिनीकांत गोल्लागुंटा म्हणाले, “एनयू-आयक्यू हा प्लॅटफॉर्म नाविन्यता, जागतिक दर्जाचे डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम आहे. भारतामध्ये तसेच उजव्या व डाव्या बाजूने चालवल्या जाणाऱ्या वाहनांच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये ऑटोमोबाईल उद्योगातील पोकळी हा प्लॅटफॉर्म भरून काढणार आहे. आम्ही इथे सादर करत असलेल्या चार संकल्पना भविष्यात येणाऱ्या गोष्टींचा धाडसी आराखडा दाखवतात. कोणत्याही तडजोडीशिवायच्या नव्या गतिशीलतेच्या युगाची सुरुवात या संकल्पना करतात आणि ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेला नव्या अर्थाने परिभाषित करतात.”
हार्टकोअर डिझाइन तत्त्वज्ञानाचा पुढचा टप्पा :
व्हिजन.एस, व्हिजन.टी, व्हिजन.एसएक्सटी आणि व्हिजन.एक्स ही चारही वाहने महिंद्राच्या भविष्यासाठी सिद्ध असलेल्या एनयू-आयक्यू प्लॅटफॉर्मवर वेगवेगळी रूपे सादर करतात. या संकल्पना जगभरातील ग्राहकांसाठी वैयक्तिक, सर्वभूभागीय गतिशीलतेची नव्याने व्याख्या करण्याच्या महिंद्राच्या कटिबद्धतेचे प्रतिके आहेत. या संकल्पनांमध्ये मजबूत ब्रँड परंपरेची सांगड अत्याधुनिक व अभिव्यक्तिपूर्ण डिझाइनशी घालण्यात आली आहे. व्हिजन.टी आणि व्हिजन.एसएक्सटी या मॉडेल्सची धाडसी आणि प्रतीकात्मक अशी ओळख आहे, व्हिजन.एसचा खेळाडूवृत्तीचा आणि भक्कम असा स्वभाव आहे, तर व्हिजन.एक्समध्ये शिल्पवत, चपळ आणि तंदुरुस्त शैली दिसून येते. अशा प्रकारे प्रत्येक मॉडेलचे स्वतःचे ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व आहे. मुंबईतील महिंद्रा इंडिया डिझाइन स्टुडिओ (एमआयडीएस) आणि युकेतील बॅनबरी येथील महिंद्रा अॅडव्हान्स्ड डिझाइन युरोप (एमएडीई) यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या या चार संकल्पना ब्रँडच्या सतत विकसित होत असलेल्या डिझाइन भाषेचे प्रतीक आहेत. यांत काळाच्या कसोटीवर उतरलेली ब्रँडची वैशिष्ट्ये आणि आधुनिक, भविष्याभिमुख नाविन्य यांचा सुरेख समतोल आहे.
महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये तयार केलेल्या या संकल्पना २०२७ पासून उत्पादनात येतील. ही धाडसी रणनीती भारतातील मोठ्या ग्राहकवर्गाला जागतिक दर्जाच्या, लक्झरी एसयूव्ही उपलब्ध करून देण्याच्या महिंद्राच्या ध्येयाला गती देईल, तसेच डाव्या हाताने चालवल्या जाणाऱ्या (लेफ्ट-हॅंड ड्राईव्ह) बाजारांसह आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रीमियम एसयूव्हीचा अनुभव नव्याने परिभाषित करेल.