
मंगळागौर हा एक महत्त्वाचा मराठी सण आहे. जो प्रामुख्याने श्रावण महिन्यात साजरा केला जातो हा सण गौरी देवीच्या उपासनेसाठी आणि आशीर्वादासाठी आहे श्रावण महिन्याचे औचित्य साधून ठाण्यात खेळ मंगळागौरीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे ठाण्यातील गडकरी रंगायचं नाही ते ठाणे जिल्हा शाखा आणि शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीने 17 ऑगस्ट रोजी खेळ मंगळागौरीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला सौ लता एकनाथ शिंदे या उपस्थित राहणार आहेत. या मंगळागौरी सोहळ्यात जिम्मा, फुगडी,संगीत असे विविध पारंपारिक खेळ खेळले जातात मंगळागौर म्हणजे महिलांसाठी सांस्कृतिक खेळांची मेजवानीच असते.