
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर्स या संस्थेच्या ठाणे चाप्टरच्या माध्यमातून प्रसिद्ध आर्किटेक्शी संवाद कार्यक्रमाचे आयोजन.
ठाणे -:
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर्स या संस्थेच्या ठाणे चॅप्टरच्या विद्यमाने प्रसिद्ध आर्किटेक्शी संवाद या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते. काळातील मानपाडा येथील अनंतम बँक्वेट हॉल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध आर्किटेक जिग्नेश मोदी आणि प्रकाश सुतारिया यांनी नवोदित आर्किटेक ना मार्गदर्शन केले. ठाणे चाप्टरच्याअध्यक्षा रश्मी तिवारी यांच्या माध्यमातून सातत्याने नवोदित आर्किटेक साठी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केले जातात. संस्थेच्या अध्यक्ष रश्मी तिवारी यांनी वेल बिंग थ्रू इंटरियर डिझाईन या विषयावर मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी ठाणे मुंबई तसेच कल्याण येथील आर्किटेक व इंटिरियर डिझायनर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर रामको इंडस्ट्रीज हे या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर या संस्थेच्या ठाणे चॅप्टरच्या अध्यक्षा रश्मी तिवारी यांचे प्रसिद्ध आर्किटेक जिग्नेश मोदी व प्रकाश सुतारिया यांनी विशेष कौतुक केले. यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला.