
२२ वर्ष तरुणाचा रायलादेवी तलावात बुडून मृत्यू..
ठाणे : ठाण्यातील रघुनाथ नगर येथील रायलादेवी तलाव येथे बुधवारी १६ जुलै रोजी संध्याकाळी ६ : २० मिनिटांच्या सुमारास २२ वर्षे एक तरुण पोहण्यासाठी गेली असता, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्य झाल्याची घटना समोर आली आहे. या मयत तरुणाचे नाव गुरुराज पेडामकर असून हा रघुनाथ नगरचा राहणारा होता. दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वागळे पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, अग्निशमन दलाचे, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांनी घटनास्थळी धाव घेत शोध कार्य सुरू केले. तसेच माजी लोकप्रतिनिधी विकास रेपाळे, माजी लोकप्रतिनिधी श्रीमती मिनल संख्ये यांनी घटनास्थळी उपस्थिती राहून घटनेची माहिती घेतली. तलावात बुडालेल्या या तरुणाला तब्बल एक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात यश आले असून वागळे इस्टेट पोलीस अधिकारी यांच्यामार्फत मयत तरुणाचे शव पुढील कार्यवाहीकरिता जिल्हा शासकीय रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे.