
ठाणे, १५ : शिवसेनेचे मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेब आणि लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात युवासेना राज्य कार्यकारिणीची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत संपूर्ण राज्यभरातून युवासेना कार्यकारिणी सदस्य, जिल्हा अध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष, समन्वयक, निरीक्षक, विधानसभा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, युवासेना पदाधिकारी, युवतीसेना पदाधिकारी व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान संघटनात्मक बळकटीकरण, आगामी उपक्रम तसेच राज्यभरात युवासेनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच तरुणांना संघटनेशी अधिकाधिक जोडण्यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,
“युवासेना ही तरुणांची शक्ती आहे. राज्यातील प्रत्येक तरुणाला विकासाच्या आणि समाजसेवेच्या कामांमध्ये सहभागी करून घेणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. शिवसेनेच्या विचारांवर विश्वास ठेवून तरुणांनी संघटनेत सक्रियपणे काम करावे आणि समाजहिताचे उपक्रम राबवावेत.”

या बैठकीमुळे राज्यभरातील युवासेना पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात संघटनात्मक कामाला अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी विविध पक्षप्रवेश पार पडले.
(युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक जनसंपर्क कार्यालय )









