
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज धुळवडीच्या सणानिमित्त ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदाश्रमात जाऊन स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे आणि स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना रंग लावून विनम्रपणे अभिवादन केले.
यंदा शिवसेना परिवारातील काही पदाधिकाऱ्यांच्या जवळच्या व्यतींचे निधन झाल्याने तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे शिंदे यांनी यंदा धुळवड न साजरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचवेळी सर्वांना धुळवडीच्या शुभेच्छा मात्र दिल्या. होळी आणि धुळवडीचा सण सर्वांसाठी सुख समाधान ऐश्वर्य आनंद आणि सप्तरंगाची उधळण करणारा ठरो अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, बाळा गवस, कमलेश चव्हाण, स्वानंद पवार आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी आवर्जून उपस्थित होते.









