
ठाणे : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील शुभ दीप निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत मुंबईसह राज्यातील विविध महानगरपालिका निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी इतर महानगरपालिकांमध्ये रिपब्लिकन पक्ष ला देण्यात आलेल्या जागांबाबतही विचारविनिमय झाला. तसेच मुंबई जिल्हा नियोजन समितीसह विविध समित्यांवर आरपीआयच्या कार्यकर्त्यांना सामावून घ्यावे, अशी आग्रही मागणी रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली.
यावर प्रतिक्रिया देताना शिंदे यांनी स्पष्ट केले की, आरपीआयकडून कार्यकर्त्यांची यादी प्राप्त झाल्यास सकारात्मक भूमिका ठेवून समित्यांमध्ये प्राधान्याने आरपीआय कार्यकर्त्यांना सामावून घेतले जाईल.
दरम्यान, आगामी पालिका निवडणुकीत महायुती म्हणून एकमेकांना भक्कम साथ देण्याचे निश्चित करण्यात आले.









