
ठाण्यातील हिरानंदानी मॅडस महाराष्ट्र नगर येथील म्हाडा चे रहिवासी १५ वर्ष उलटूनही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत
ठाण्यातील हिरानंदानी मॅडस महाराष्ट्र नगर येथील म्हाडा चे रहिवासी १५ वर्ष उलटूनही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. विकासक अजूनही या रहिवाशांना तारखाच देत आहेत.
२४ जानेवारी २०२५ ला पुन्हा कमिटीची मीटिंग झाली, त्यात बांधकाम फेब्रुवारीमध्ये जोमात सुरू होईल असे विकासकाने सांगितले. त्यानंतर २३ फेब्रुवारीला सर्व रहिवाश्यां समोर त्यांनी मार्च संपेपर्यंत कामाला जोरात सुरुवात होईल असे सांगितले. नवीन ईमेलनुसार रहिवाश्यांना ऑगस्ट संपेपर्यंत वाट बघायला सांगितले आहे.
१५ वर्ष झाले, तरी विकासक रहिवाश्यांना तारीखच देत आहेत. विकासक फक्त तारीखच देणार की बांधकाम करून घर पण देणार? हा विचार, हा संभ्रम लोकांचे चित्त विचलित करत आहे. याचा लोकांना मानसिक त्रास/छळ होत आहे.
त्याचा निषेध म्हणून शनिवार दिनांक १४/०६/२०२५ रोजी सकाळी ११ वाजता, सर्व रहिवासी शांततापूर्ण आंदोलन करत आहोत. या आंदोलनात माननीय स्थानिक नगरसेविका श्रीमती स्नेहाताई आंब्रे उपस्थित राहणार आहेत. तसेच आमदार श्री. संजय केळकर ह्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती रहिवाश्यांनी दिली आहे.
तरी सर्व पत्रकार मित्रांनी उपस्थित राहून रहिवाश्यांना न्याय मिळवून देण्यास सहकार्य करावे, अशी विनंती महाराष्ट्र नगर म्हाडा रहिवासी यांनी केली आहे.