
ठाण्यात श्री साईनाथ मंदिराचा ३१ वा वर्धापन दिन उत्सव सोहळा
ठाणे : नौपाडा येथील श्री साईनाथ सेवा समिती, श्री साईनाथ मंदिर, पोदार रोड, वर्तकनगर यांच्या वतीने ३१ वा वर्धापन दिन उत्सव सोहळा मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. हा सोहळा येत्या बुधवार, १२ नोव्हेंबर २०२५ ते शुक्रवार, १४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.या उत्सवाच्या निमित्ताने स्व. बळीराम वासुदेव नाईकबागकर माजी नगरसेवक यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात येणार असून, त्यांच्या आशीर्वादाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.प्रत्येक भाविकांना शिर्डीला जाणे शक्य नसते प्रतिशिडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या साई मंदिरात दरवर्षी वर्धापन दिन साजरा केला जातो. येणाऱ्या प्रत्येक भाविकाला येथे लाडूचा प्रसाद दिला जातो. त्या अनुषंगाने येथे 20 टन लाडू प्रसादासाठी बनविण्यात आले आहेत.वर्धापन दिन कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवार, १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता होणार असून, त्यानंतर श्री लक्ष्मीनारायण यज्ञ यज्ञ होईल. गुरुवार, १३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी गायक, भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत.शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी साईबाबांचा पालखी सोहळा, गायक-भजन आणि किर्तन तसेच प्रसाद वितरण होणार आहे. सर्व भक्तांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष मंगेश सुहासिनी बळीराम नाईकबागकर यांनी केले आहे.तर उत्सवविषयीची माहिती हरी माळी यांनी दिली आहे.







