
सरन्यायाधीश अवमाननेचा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाकडून निषेध
बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती बांधून मूक निदर्शने
ठाणे – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर तिवारी याने भर न्यायदान कक्षात बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्याने या कृत्याबद्दल पश्चातापही व्यक्त केला नाही. त्यानिषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली तसेच ॠताताई आव्हाड यांच्या उपस्थितीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मूक निदर्शने करण्यात आली.
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरू असताना राकेश किशोर तिवारी या वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेवर हल्ला असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. सर्व कार्यकर्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून तसेच हातात संविधानाच्या प्रति घेऊन बसले होते.
या प्रसंगी मनोज प्रधान म्हणाले की, सोमवारी राकेश किशोर या वकिलाने सरन्यायाधीशांवर बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीश म्हणजे, देशाच्या न्यायप्रक्रियेतील सर्वोच्च स्थान आहे. आज तेही सुरक्षित नसतील तर देशातील एकही नागरिक सुरक्षित नाहीत, हेच स्पष्ट होत आहे. खजराहो येथील विष्णू मंदिराबाबत किशोर यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी, खजुराहो हा जागतिक वारसा असून ते पुरातत्व खात्याच्या अखत्यारित येत आहे. त्यामुळे पुरातत्व खात्याकडे जावे. मात्र, राकेश किशोर हे ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नव्हते. त्यांनी बूट फेकण्याचा घृणास्पद प्रकार केला. हा बूट फेकण्याचा प्रयत्न फक्त न्यायव्यवस्थेवर नव्हता. तर ते बौद्ध समाजातून आलेले असल्यानेच राकेश किशोर याने हे कृत्य केले आहे. याआधीही भूषण गवई जेव्हा महाराष्ट्रात आले होते. तेव्हाही राज्य शासनाने त्यांना प्रोटोकॉल दिला नव्हता. यावरून मागासवर्गीय माणूस सर्वोच्च स्थानी बसल्याचे या लोकांना मान्य नसल्याचेच दिसून येत आहे, असा आरोप केला. प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी, या घटनेचा आम्ही निषेध करतो. ही घटना फक्त व्यक्ती म्हणून न पाहता न्यायव्यवस्थेवर केलेला हल्ला आहे, असे सांगितले. सनातन धर्माच्या नावाखाली दंगली भडकावण्याचा प्रयत्न असून हा देशातील नागरिकांवरील हल्ला आहे, अशी टीका युवक अध्यक्ष अभिजीत पवार यांनी केली.
या आंदोलनात ठाणे शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, महिला कार्याध्यक्षा साबिया मेमन, युवक अध्यक्ष अभिजीत पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम , महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मकसूद खान, प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य, ठाणे जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष गजानन चौधरी, ठाणे जिल्हा असंघटित सेल अध्यक्ष राजू चापले, ठाणे जिल्हा माथाडी अध्यक्ष सचिन पंधरे,शिवा कालुसिंग, प्रवीण सिंह, कैलास हावळे, राजू चापले, विक्रांत घाग, संतोष मोरे,रोहिदास पाटील, कैलास सूरकर, इकबाल शेख, पद्माकर पाटील, राहुल भालेराव, विशांत गायकवाड, प्रभाकर सावंत, सिद्धांत व्हटकर, माधुरी सोनार, श्रीकांत भोईर,धर्मेंद्र अस्थाना,ज्ञानेश्वर राजपंके,दिलीप उपाडे,संदीप येताळ, दिगंबर गरुड, साहिल उदुगडे, कुणाल वाघ, राजू पाटील, सुनीता मोकाशी, मल्लिका पिल्लई, रेश्मा भानुशाली, रेणुका अलगुडे, ज्योती निंबरगी , हाजी बेगम शेख, कल्पना नार्वेकर, मनिषा म्हात्रे, अश्विनी मोरे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.










