
संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत
ऑक्सफर्ड इंग्लिश ह्या शाळेत शनिवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी ” उद्दोता” ह्या आंतरशालेय स्पर्धा उपक्रमात अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्या निमित्ताने ठाणे,मुलुंड परिसरातील वेगवेगळ्या एकूण १८शाळांमधील एकूण २९३ विद्यार्थी सहभागी झाले होते.
ह्यावेळी विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन आपल्या शाळेचे प्रतिनिधित्व केले.
ह्या आंतरशालेय स्पर्धेत अगदी पूर्व प्राथमिक विभागापासून माध्यमिक विभागापर्यंतच्या वयोगटासाठी सर्व स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या.
ज्यात वेशभूषा स्पर्धा, एकल नृत्य,एकल गायन,क्ले मोल्डिंग,पोस्टर मेकिंग,संस्कृत श्लोक पठण स्पर्धा, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविणे, चित्रकला स्पर्धा, स्टोरी टेलिंग, मोनो अकटिंग, power point presentation आणि जनरल नॉलेज प्रश्नमंजुषा अश्या अनेकविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्याच बरोबर ह्या स्पर्धांचे परीक्षण करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील अतिशय पारंगत असे परीक्षक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते,
गायन स्पर्धेसाठी, आकाशवाणी केंद्र B ग्रेड उत्तीर्ण असलेल्या तसेच दूरदर्शन वरील अनेक संगीत कार्यक्रमातून गायन कला सादर केलेल्या सौ मेघना काळूंद्रेकर
तर श्लोक पठण स्पर्धेसाठी नामांकित व्यक्तिमत्व प्रा.सौ.मेधाताई सोमण,
मोनो अकटिंग स्पर्धेसाठी – ओंकार चव्हाण
नृत्य स्पर्धा,_शोधन बंगेरा
वेशभूषेसाठी- झोया गोसावी
इंग्लिश स्टोरी Telling, स्टोरी writing जितेंद्र देसाई
चित्रकला/हस्तकला स्पर्धेसाठी -बॉसकी कुबाडिया,
त्याच बरोबर कॅरम स्पर्धेसाठी अविनाश थोरवे अश्या विविध स्पर्धा परीक्षकांच्या उपस्थितीत तसेच विविध शाळांतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्या…ह्या निमित्याने वेगवेगळ्या शाळांच्या विद्यार्थ्यांचे…मान्यवरांचे विचार आदानप्रदान होतात ,त्यांच्यातील सुप्तगुणांना तर वाव मिळतोच..पण हल्लीच्या तंत्रज्ञानाच्या युगात …स्पर्धेच्या युगात आपली क्षमता किती आहे ? आपण कुठे कमी पडलो…किंवा काय करावे करू नये ह्यासाठीचा अंदाज ह्या उद्योता सारख्यास्पर्धा मधून विद्यार्थ्यांना घ्यायची संधी मिळते… अश्या स्पर्धेतूनच नवनवीन प्रयोग करण्यास ते प्रवृत्त होतात व एक जिद्द त्यांच्या मध्ये तयार होते. विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय जीवनात सर्वांगीण विकासासाठी ह्या “उद्योता” सारख्या स्पर्धा नक्कीच उपयुक्त ठरतील . ह्यात काहीच शंका नाही.आणि म्हणूनच अश्या स्पर्धांचे आयोजन करणे गरजेचे आहे. हा उदात्त विचार ऑक्सफर्ड इंग्लिश शाळेचे संस्थापक मा. रविंद्र फाटक ह्याच्या मार्गदर्शनाने शाळेतील कार्यकारी मंडळाने मनाशी ठेवून ह्या स्पर्धेचे आयोजन केले .
नेहेमीच ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल विद्यार्थ्यांच्या विकासासाठी खूप विचारपूर्वक पावलं उचलत असते,
त्यात शाळेच्या स्वच्छतेपासून विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांपर्यत विद्यार्थ्यांचाच विचार डोळ्यासमोर सातत्याने केला जातो.तेंव्हा बाहेरील विद्यार्थी व मान्यवर परीक्षक हे आपले अतिथी आहे ह्या भावनेतून विद्यार्थ्यांच्या मनाला उभारी यावी…आपल्या शाळेत येऊन इतर शाळेतील विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे मान्यवर परीक्षकांना आनंद मिळावा…एक अविस्मरणीय दिवस ठरावा
त्यासाठी संपूर्ण शाळेचा परिसर,कानाकोपरा अतिशय सुबकतेने सजवला होता, ह्या सजावटीचे विशेष आकर्षण म्हणजे शाळेतील कला शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने “सेल्फी पॉईंट” तयार केला होता..
अतिशय सुंदर अश्या कलाकृती विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळेत लावून शाळा सुशोभित करण्यात आली होती.
त्याचप्रमाणे २६ ऑगस्ट २०२५ ह्या दिवशी बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला.ह्यावेळी शाळेचे संस्थापक, माननीय आमदार श्री.रवींद्र फाटक साहेब तसेच श्री. प्रणय फाटक सर, सौ देविका फाटक मॅडम. शाळेचे विश्वस्त श्री. सुरेश कडू सर व दोन्हीही विभागाच्या मुख्याध्यापिका प्राथमिक विभाग सौ.रेखा पाटील मॅडम तर माध्यमिक विभागाच्या सौ दुर्गा गुप्ता मॅडम. शाळेच्या पर्यवैक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,.. विजेते विद्यार्थी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय उत्साहात हा कौतुक सोहळा पार पडला.