
राज्य निवडणूक आयोगाची सार्वत्रिक निवडणुकीसाठी आढावा बैठक कोकण विभागात संपन्न
जिल्हा परिषद, नगर पंचायत व महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक आढावा बैठक राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आज कोंकण विभागात पार पडली.
या बैठकीस राज्य निवडणूक अयोगाचे सचिव सुरेश काकाणी (भा.प्र.से.), कोंकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, राज्य निवडणूक आयोगाचे विशेष कार्यकारी आधिकारी अं. गो. जाधव, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, वसई-विरार महानगरपालिका आयुक्त एम.एम.सूर्यवंशी, मिरा-भायंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मनिषा आव्हाळे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका आयुक्त अनमोल सागर, जिल्हाधिकारी ठाणे डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे, जिल्हाधिकारी पालघर श्रीमती इंदूराणी जाखड, जिल्हाधिकारी रत्नागिरी एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी सिंधुदूर्ग अनिल पाटील तसेच निवडणूक संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.