
शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस बाळकुम परिसरामध्ये साजरा करण्यात आला बाळकुम परिसरातील ठाणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये हा वाढदिवस मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप साजरा करण्यात शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम येथे संपन्न झाला.यंदाचे हे सतरावे वर्ष असून सलग सहा दिवस हा सामाजिक उपक्रम महापालिकेच्या विविध शाळांत राबविण्यांत येणार असून १५०० विद्यार्थ्यांना वाटप करणार असल्याचे सुनिल पाटील यांनी सांगितले.ठाणे महानगर पालिकेच्या बाळकुम शाळा क्र. ६०,११२ व माध्यमिक शाळा क्र. ४ या शाळांतील विद्यार्थ्यांन शैक्षणिक साहित्य वाटप करण्यांत आले. यावेळी कोलगेट-पामोलिवचे अधिकारी रुपेश गाडेकर यांनी ‘दातांची काळजी कशी घ्यावी’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक ठाणे उपजिल्हाप्रमुख व जनहित फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनिल पाटील यांनी केले.सदर प्रसंगी शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे, ‘कमळी’ या झी टी.व्ही. वरील मराठी मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेते अनिकेत केळकर, शहर प्रमुख प्रदिप शिंदे, नगरसेवक संजय तरे, कोलगेट-पामोलिवचे अधिकारी रूपेश गाडेकर, उपशहरप्रमुख चंद्रकांत नार्वेकर, विभाग प्रमुख अरविंद भोईर, जयश्री म्हामुणकर, शिक्षक वृंद व प्रभागातील नागरीक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांसोबत १५ किलोचा केक कापून पक्षप्रमुख श्रीमान उध्दवजी ठाकरे साहेब यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनातील गरजू साहित्यांचे वितरण करीत त्यांचा सन्मान करण्यात आला.