
थेट 15% सूट*! ठाण्यातील तिसऱ्या स्टोअर लाँचचा आनंद
क्रोमाने साजरा केला
ठाणे, 24 जुलै 2025: टाटा समूहाचे भारतातील पहिले आणि सर्वात विश्वासार्ह ओम्नी चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर, क्रोमाने ठाणे पश्चिम येथे नवीन स्टोअर सुरू करत मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये स्वतःचे स्थान भक्कम केले आहे. हे ठाण्यातील तिसरे तर महाराष्ट्रात 106 वे स्टोअर आहे. स्थानिकांना दर्जेदार उत्पादनांचा अनुभव देतानाच प्रीमियम तंत्रज्ञानाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी असलेली क्रोमाची वचनबद्धता यामुळे सिद्ध होते.
या नवीन शोरूमच्या उद्घाटनाचा आनंद साजरा करण्यासाठी, २० जुलै ते १९ ऑगस्ट दरम्यान क्रोमा निवडक इलेक्ट्रॉनिक्सवर 15% पर्यंतची सूट* देत आहे.
इटर्निटी मॉलच्या समोर आणि तीन हात नाका फ्लायओव्हरला लागून – महावीर बिझनेस पार्क येथे हे स्टोअर आहे. व्यावसायिकदृष्ट्या ही अत्यंत मोक्याची जागा असून 7,661 चौरस फूट क्षेत्रफळावर विस्तारलेले हे स्टोअर दुमजली आहे. या लाँचमुळे मोठ्या स्वरूपातील इलेक्ट्रॉनिक्स रिटेल स्पेसमध्ये क्रोमा आघाडीवर आहे. आता 200+ शहरांमध्ये 560+ स्टोअर्स तसेच 550 हून अधिक ब्रँड्सची 16,000 हून अधिक उत्पादने येथे उपलब्ध आहेत.
या नवीन स्टोअर्सच्या उद्घाटनाबद्दल इन्फिनिटी रिटेल लिमिटेडचे प्रवक्ते म्हणाले, “मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमधील एक प्रमुख महत्त्वाचे केंद्र म्हणून ठाणे उदयास येत असताना तिथेच नवीन क्रोमा स्टोअर सुरू होणे, हे आमच्या विस्तारातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आमची ग्राहककेंद्री सेवा यामुळे आमच्या ग्राहकांना नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनाला पाठबळ मिळते. सुविधा आणि नावीन्य अशा दोन्ही गोष्टींची उपलब्धता असलेल्या या स्टोअरसह ठाण्यातील तंत्रज्ञानप्रेमी समुदायाची सोय करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
ठाणे हा मुंबई महानगर प्रदेशाचा (एमएमआर) अविभाज्य भाग असल्याने ठाण्यात शहरीकरण, पायाभूत सुविधांचा विकास आणि ग्राहकांच्या मागणीत वेगाने वाढ होते आहे. एमएमआरमधील रहिवासी प्रीमियम इलेक्ट्रॉनिक्सच्या शोधात असतात. त्यामुळे ठाण्यातील स्टोअर ही क्रोमासाठी एक अत्यंत महत्त्वाची संधी आहे. आपले स्थान भक्कम करण्यासोबतच आणि शहराच्या बदलत्या जीवनशैलीच्या गरजा पूर्ण करण्याची क्रोमाला उत्तम संधी आहे.