
ज्येष्ठांनी आपल्यासाठी अनेक खडतर पावसाळे काढलेले असतात. आता उतार वयात त्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्यच – खा.नरेश म्हस्के
ठाणे: शिवसेना नौपाडा विभागात शिवसेना ठाणे विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांच्यावतीने काल प्रभाग क्रमांक 21 मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्नेह संमेलन,जेष्ठ नागरिक स्नेह संमेलनासोबत जेष्ठ नागरिक अत्याचार दिनानिमित्त नौपाडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी सर्व जेष्ठाना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच या वेळी नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर त्यात सर्व आजारांवर तज्ञ् डॉक्टर मंडळी कडून तपासणी, नेत्र तपासणी व चष्मा वाटप करण्यात आले .तसेच त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्री वाटपाचा उत्तम उपक्रम आज करण्यात आला होता. तसेच सांगितिक कार्यक्रम ही येथे आयोजित करण्यात आला होता.
सर्व कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.विविध प्रकारचे उपक्रम राबवित ज्येष्ठांचे संमेलन येथे संपन्न झाले.अनेक ज्येष्ठ नागरिकांना पावसाळ्यातली आरोग्याची काळजी कशी घ्यावी यावर मार्गदर्शन करून पावसापासून संरक्षणासाठी छत्रीचं वाटप करण्यात आलं. आणि त्यांचा सत्कार सोहळाही करण्यात आला.ज्येष्ठांचा सत्कार म्हणजे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे. ही आपली संस्कृती आहे आणि त्यामुळेच अतिशय उत्तम कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांचं कौतुक आणि अभिनंदन केलं.
नौपाडा विभागात होत असलेल्या विविध सामाजिक आणि समाजोपयोगी कार्यक्रमांच्याबद्दलही म्हस्के यांनी सर्व कार्यकर्त्यांचं कौतुक केलं.यावेळी सदर कार्यक्रम प्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मिनाक्षी शिंदे,शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, शिवसेना लोकसभा सचिव बाळा गवस,नौपाडा विभाग प्रमुख किरण नाकती, प्रीतम राजपूत, सिमा राजपूत,
आणि सर्व पदाधिकारी शिवसैनिक बंधू भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.