
भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र दादा चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते व माजी नगरसेवक अमित सरैया यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी उल्हासनगरमधील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील भाजपा पक्षप्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्यासाठी ठाणे शहर आमदार मा. संजय केळकर, उल्हासनगर आमदार श्री. कुमार आयलानी, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवीताई नाईक, भाजपा प्रदेश महासचिव व विधानपरिषद आमदार श्री. विक्रांत पाटील, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, तसेच ठाणे-पालघर महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार संघ जिल्हाध्यक्ष संजयजी वाघुले, पत्रकार व भाजपा माध्यम प्रमुख श्री. नवनाथ बन व इतर पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
असंख्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने झालेल्या या प्रवेशामुळे ठाणे जिल्ह्यातील भाजपाचा किल्ला आणखी भक्कम झाला आहे.